Skip to main content

Posts

Showing posts from February, 2015

मंदिर, पुजारी आणी दक्षिणा

मित्रांनो, नुकतेच माझे एक स्नेही मथुरा, वृन्दावन, अमृतसर इत्यादी गाव फिरून आले. तेथील अनेक चित्रविचित्र अनुभव मनोरंजक होते. मथुरेमधील एक अनुभव ऐकून विचारात पडलो. एका मंदिरात तिथल्या पूजार्याने आधी दानधर्माचे महत्त्व सांगून देवदर्शन करुदिल्याबद्दल दक्षिणा मागितली. त्यंनीं दक्षिणा देण्याचे नाकरल्यावर, पुजारी अत्यंत रागवला असे सांगत होते. त्यांच्या मते देवदर्शनाकरता दान दक्षिणा मागणे योग्य नव्हे. थोड्याफार फर्काने हे चित्र बऱ्याच देवळांमधे दिसते. या ना त्या कारणाने पंडित/पुरोहीत लोक भक्तां कडून पैसे/धान्य वा इतर वस्तु मिळवण्याचा प्रयत्न करतात. बरेच वेळा भक्त मंडळी नाइलाजने अथवा भीती मुळे इच्छे विरूद्ध मागण्या मान्य करतात, नाहीतर अशा लोकंपासून सावध राहतात. अशा कटु अनुभवांन मुळे काही लोकांना मंदिरात जायला आवडत नाही. काहींना हा सर्व प्रकार पाहून हिंदु धर्माची लाज वाटते. आपल्याला पण असे अनुभव आले असतील. खरे सांगायचे तर हि परिस्थिती बदलयची असेल तर काही गोष्टी आपण जाणून घेणे ज़रूरी आहे. 1. मंदिरातला पूजारी/पुरोहीत एक मनुष्य आहे. त्याच्या कुटुंबाची त्याच्यावर जवाबदारी आहे. 2. त्याच्या उपजीवि