Skip to main content

मंदिर, पुजारी आणी दक्षिणा

मित्रांनो,

नुकतेच माझे एक स्नेही मथुरा, वृन्दावन, अमृतसर इत्यादी गाव फिरून आले. तेथील अनेक चित्रविचित्र अनुभव मनोरंजक होते. मथुरेमधील एक अनुभव ऐकून विचारात पडलो. एका मंदिरात तिथल्या पूजार्याने आधी दानधर्माचे महत्त्व सांगून देवदर्शन करुदिल्याबद्दल दक्षिणा मागितली. त्यंनीं दक्षिणा देण्याचे नाकरल्यावर, पुजारी अत्यंत रागवला असे सांगत होते. त्यांच्या मते देवदर्शनाकरता दान दक्षिणा मागणे योग्य नव्हे.

थोड्याफार फर्काने हे चित्र बऱ्याच देवळांमधे दिसते. या ना त्या कारणाने पंडित/पुरोहीत लोक भक्तां कडून पैसे/धान्य वा इतर वस्तु मिळवण्याचा प्रयत्न करतात. बरेच वेळा भक्त मंडळी नाइलाजने अथवा भीती मुळे इच्छे विरूद्ध मागण्या मान्य करतात, नाहीतर अशा लोकंपासून सावध राहतात. अशा कटु अनुभवांन मुळे काही लोकांना मंदिरात जायला आवडत नाही. काहींना हा सर्व प्रकार पाहून हिंदु धर्माची लाज वाटते. आपल्याला पण असे अनुभव आले असतील.

खरे सांगायचे तर हि परिस्थिती बदलयची असेल तर काही गोष्टी आपण जाणून घेणे ज़रूरी आहे.

1. मंदिरातला पूजारी/पुरोहीत एक मनुष्य आहे. त्याच्या कुटुंबाची त्याच्यावर जवाबदारी आहे.
2. त्याच्या उपजीविकेचे साधन फक्त दान/दक्षिणा आहे. इतर शिक्षण नसल्याने दूसरे प्राप्तीचे साधन नाही.
3. त्याला मंदिर सोडून ठराविक वेळेत क्वचित् बाहेर जाऊन इतर धार्मिक कार्यात पौरोहित्य करता येते.
4. लोक मंगल कार्यात हज़ारों रुपये आनंदाने खर्च करतात पण पुरोहिताला दक्षिणा अगदी अनिछेने उपकार केल्यागत देतात.
5. लग्न कार्यात भरपूर वायफळ खर्च करतात पण पुरोहिताला निकृष्ट दरज्याचे कापड, धान्य इत्यादी देतात.
6. वास्तुशास्त्री/फेगशुई एक्सपर्ट/भविष्य संगणाऱ्यांना वाटेल तेवढे पैसे द्यायला लोक तयार होतात, पण आपल्या घरच्या धार्मिक कार्याला वेळ देवून, आशीर्वाद देणाऱ्या पुरोहिताला थोडी जास्त दक्षिणा देणे आयोग्य वाटते.
7. आजपर्यंत श्रीमंत तर सोडाच, मध्यम परिस्थितितला पूजारी कधीच भेटला नाही. सगळे जेमतेम आपला संसार रेटतात.
8. हॉटेल मधे वेटरला पगार मिळत असला तरी स्वखुशीने टिप देतात पण मंदिरात पुजाऱ्याला दक्षिणा देणे मान्य नहीं.
9. कधी पुजारी रीटायर होऊन आराम करताना पहिला आहे? आंगात शक्ति व् प्राण असे पर्यंत पुजारी सेवा करत राहतात.
10. तुटपुंज्या आवक मुळे दिवसेंदिवस पूजारी कमी होत आहेत.

अशा परिस्थितीत, पुजार्याने काय करावे? ह्यावर काही उपाय सूचतो?

शुन्य



Comments

  1. मंदीरातल्या पुजार्‍यांना देवस्थान ठराविक मासिक मानधन/ पगार देत नाही का?
    तसे ते देत असल्यास पुजार्‍यांनी मंदिरात भाविकांना जबरदस्तीने पुजा करायला सांगून दक्षिणा मागणे योग्य नाही. जर तसे नसल्यास नियम करून प्रत्येक देवस्थानाने पुजार्‍यांना योग्य ते ठराविक मानधन/पगार द्यावा आणि भाविकांकडून पुजार्‍यांनी वेगळी दक्षिणा मागणे नियम करून बंद करावे. जर का देवस्थानांनी कडक नियम लावले आणि त्याची अंमलबजावणी झाली तर हे प्रकार नक्कीच बंद होऊ शकतील. (गजानन महाराजांचे शेगाव येथील मंदीर याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.)

    पौरोहित्य करणारे गुरुजी आणि मंदिरात असलेले पुजारी यात फरक आहे असे मला वाटते. पौरोहित्य करणारे गुरुजी एक प्रकारे सेवाभाव असलेला व्यवसाय करतात असे मला वाटते. फक्त पौरोहित्य करुन श्रीमंत झालेले गुरुजी कधी बघितले नाहीत हे खरे. मध्यमवर्गीय जीवनशैली असलेलेच बहुतांश गुरुजी दिसतात. नोकरी करून साईड इन्कम म्हणून पौरोहित्य करणारे पण अनेक जण ओळखीत आहेत. म्हणजे एका कुटुंबाला पोसता येईल इतपत पैसे यात नक्कीच मिळत असणार.

    १० नंबरच्या मुद्द्याशी मात्र सहमत नाही. तुटपुंज्या आवक मुळे पुजारी कमी होत आहेत असे नसून नविन पिढीतल्या तरूणांना हे प्रोफेशन तितके आकर्षित करत नाही हे मुख्य कारण असावे. त्यातून बहुतांश ब्राह्मण समाजाला असलेले व्हाईट कॉलर 'जॉबचे' आकर्षण. पौरोहित्य करत असणार्‍या व्यक्तिने ठराविक पद्धतीनेच रहावे ही समाजाची अपेक्षा. दररोज सोवळे धोतर असे जुन्या पद्धतीचा पेहराव करावा लागणे. ल्ग्नाच्या बाजारात मुलींना पौरोहित्य करत असलेली मुले नको असणे अशी अनेक कारणे असतील.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Carver, Ford, Soyabeans……..

    Dear Friends, Today’s post is about lifelong friendship of two distinguished Americans, George Washington Carver and Henry Ford with different background. This friendship is an interesting example of long-term benefits for the entire society. G W Carver, born in 1864 was raised as a slave’s kid on the farm of his mother’s former master Moses Carver. Carver developed a keen interest in plants, in the surrounding woods. Eventually he became the only African American with an advanced degree in scientific agriculture at that time. Henry Ford, on the other hand, was born on his father’s farm in 1863. While studying, Ford used to build water wheels and steam engines. Eventually Ford became an Industrialist and founded “Ford Motor Company”. In 1937, Carver and Ford met at a meeting of pioneers in the chemurgy movement, a branch of applied chemistry for industrial products from agricultural raw materials. This meeting was the start of a lifelong friendship. Those days no...

Zero got GOOGLED !

Dear friends, More than a decade ago, I started using Mahajaal (Internet). You may agree that this is one of the most important invention of century that changed life of almost entire literate population through out the world. Those days, for a layman like me, using Computer was a Love/Hate experience. My introduction to the fascinating world of Google was also almost at the same time. I used Google as a search engine to search information on net. It was and even today very simple. You type the name/subject, hit enter and PRESTO! A list of well sorted sites is in front of you to explore. Than came Google earth, the most fascinating and mesmerising experience of seeing various places on earth from the sky. Our own locality, friends house looks so different from the top! Google maps is a great help in North American cities to find address. G-mail gave an altogether different experience of e-mail usage. The well laid out mail box is so convenient to use. G-chat side bar lets me know abou...

SPRITUAL BUT NOT RELIGIOUS?

Dear friends, Thank you for sharing your thoughts on Spirituality and Religion. I had posted the same question on ibibo and got equally interesting five responses. Your feedback gave an insight in to what people generally think about Spirituality and Religion. The gist of replies is as below: Except one, all were of the opinion that a person can be Spiritual but not religious. For most of them Spirituality was like, quest to understand oneself, identify self with universe, selfless service to the society, humanity, believe in super powers of human mind and body etc As far as religion is concerned, all of them thought that religion is limited to believing in the concept of God and worshiping God by various means like performing rituals, Idol worship, chanting mantras etc. Some expressed their dislike towards religion while one said that religion is a journey to achieve Spirituality and once achieved, one need not follow religious practice of rituals etc. All these answers were a great h...